कार्तिक-क्रितीच्या ‘लुकाछुपी’चा ट्रेलर रिलीज

luka-chupi1
नुकताच कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या आगामी ‘लुकाछुपी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्यांदाच हे दोघे स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून ट्रेलरच्या आधी या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

लग्नासाठी उतावीळ असलेला कार्तिक गुडघ्याला बाशिंग बांधून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तयार आहे. लग्नासाठी तो क्रितीला प्रपोजही करतो. पण लग्नाला क्रिती नकार देऊन लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय सुचवते. यानंतर दोघांचे नाते चांगलेच गुंतते. ते पुढ इतके की, दोघेही खोट्या लग्नाच्या खोट्या बाता मारताना दिसतात.

लक्ष्मण उटेकर यांनी ‘लुकाछुपी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निर्माते दिनेश विजन आहेत. कार्तिक यामध्ये एका स्थानिक न्यूज चॅनलच्या स्टार रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. एका छोट्या शहरातील लव्ह स्टोरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. १ मार्च २०१९ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment