स्मृती मंधाना ‘हा’ पराक्रम करणारी दुसरी आंतराराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू

smriti-mandhana
न्यूझीलंडच्या संघावर भारताच्या पुरुष संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या महिला संघानेही आज न्यूझीलंड महिला संघाचा पराभव केला. भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेले शतक आणि गोलंदाजीत एकता बिश्त-पुनम यादवच्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर न्यूझीलंडवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

मराठमोळ्या स्मृती मंधानाने या सामन्यात १२० चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. भारताने तिच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. एकदिवसीय कारकिर्दीतील स्मृतीचे हे चौथे शतक होते. स्मृतीने या शतकाबरोबर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशात एकदिवसीय शतक करण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत भारताच्या एकाही महिला खेळाडूला या देशांमध्ये शतक करता आले नाही. आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या क्लेरा टेलरच्या नावावर होता.

Leave a Comment