‘मणिकर्णिका’च्या स्थगितीला उच्च न्यायालयाचा नकार

manikarnika
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतिहासात नसलेल्या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्याच्या आरोपावरुन चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. पण ही मागणी न्यायलयाने फेटाळून लावली आहे.

मणिकर्णिकाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटात इतिहासात नसलेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या असल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयात चित्रपट प्रदर्शित होण्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने याला नकार दिला आहे.

करणी सेनेकडून या चित्रपटावरून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. करणी सेनेने त्यावर मला धमक्या देणे थांबवले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा इशारा कंगनाने करणी सेनेला दिला होता. यामुळे मोठा वाद झाला. पण आता स्थगितीला उच्च न्यायालयाने नकार दिल्याने चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment