‘मेरे गली में’ गाण्यात पहा रणवीरचा हटके अंदाज

gully-boy
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ चित्रपट येणार आहे. आता नुकतेच या चित्रपटातील ‘मेरे गली में’ हे रॅप साँग रिलीज करण्यात आले आहे. हे रॅप साँग चक्क रणवीरने गायले आहे. रणवीरचा हटके अंदाज या गाण्यात पाहायला मिळत आहे. रणवीर मुंबईतील झोपडपट्टीच्या गल्लीमध्ये रॅप साँग गाताना दिसत आहे.

शंकर-एहसान-लॉय यांनी झोया अख्तरद्वारा दिग्दर्शित या चित्रपटाला संगीत दिले आहे. रणवीर आणि आलिया या चित्रपटातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याने निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला ‘गली बॉय’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment