पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांसाठी ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिल्लीत स्पेशल स्क्रीनिंग

thakre
येत्या २५ जानेवारीला संपूर्ण देशभरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात येईल अशी माहिती ‘ठाकरे’चे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

या शोचे दिल्लीत आयोजन करण्यात येईल. सेना- भाजपातील अनेक राजकीय नेते या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. ‘ठाकरे’चे स्पेशल स्क्रीनिंग भाजप- सेना युतीत आलेला दुरावा मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. स्पेशल शोचे आयोजन राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात किंवा संसदेतील थिएटरमध्ये करण्यात येईल अशी माहिती संजय राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिली. याची तारीख आणि वेळ अजूनही निश्चित व्हायची आहे असेही राऊत म्हणाले.

Leave a Comment