
लवकरच प्रेक्षकांच्या चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोठी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातील ‘कोपचा’ हे गाणे रिलीज करण्यात आले होते. हे गाणे प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रेटींनाही भूरळ घालत आहे. कोपचाच्या लोकप्रियतेनंतर या चित्रपटातील कोकणी तडका असलेले आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.
लकी चित्रपटातील ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज करण्यात आले असून हे गाणे ‘सूर नवा ध्यास नवा’ रिअॅलिटी शोमधील चैतन्य देवढेने गायले असून त्याचे हे पहिले मराठी गाणे आहे. गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे आणि आळंदीच्या चैतन्य देवढेने ह्याला स्वरसाज चढवला आहे. ‘लकी’ चित्रपटात हे गाणे अभय महाजनवर चित्रीत झाले आहे.
‘लकी’तील कोकणी तडका असलेले गाणे रिलीज
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. ७ फेब्रुवारी २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
