सुशांत सिंह राजपुतच्या आगामी रायफलमॅनचा टीजर रिलीज

sushant-singh-rajput
लवकरच ‘रायफलमॅन’ या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपुत झळकणार आहे. त्याने त्याच्या आगामी ‘रायफलमॅन’ या चित्रपटाचा दमदार टीजर १५ जानेवारीला सैन्य दिनानिमीत्त सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या ‘सोनचिडीया’ चित्रपटाचा ट्रेलरही अलिकडेच रिलीज करण्यात आला होता. तो या चित्रपटानंतर ‘रायफलमॅन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धाडसी सैन्याचे चित्रण चित्रपटातून करण्यात येणार असल्याचा अंदाज या टीजरवरुन येतो. सैन्यावर आधारित अनेक चित्रपट आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये तयार करण्यात आले आहेत. प्रेक्षकांच्याही मनात भारतीय सैन्याबद्दल आदरयुक्त स्थान आहे. सैन्याचे धाडसी चित्रण पडद्यावर पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटांकडे कल असतो.


विकी कौशलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटालाही प्रेक्षकांचा असाच दमदार प्रतिसाद लाभला. आता सैन्याची धडाडी सुशांत सिंह राजपुतच्या ‘रायफलमॅन’मधुनही दिसेल, यात शंका नाही. सुशांत सिंह राजपुतचा काही दिवसांपूर्वीच ‘केदारनाथ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खानने बॉलिवूड पदार्पण केले आहे.

Leave a Comment