रो’हिट’ शर्मा षटकारांचा नवा बेताज बादशाह

rohit-sharma
अॅडलेड – भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना तब्बल ८९ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. रोहित हा कोणत्याही एका संघाविरूद्ध ८९ षटकार ठोकणारा क्रिकेटविश्वातील एकमेव खेळाडू ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रीस गेलच्या नावावर होता. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने इंग्लंड संघाविरुद्ध ८८ षटकार मारले होते. या यादीत पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने श्रीलंका संघाविरुद्ध ८६ षटकार ठोकले आहेत.

Leave a Comment