प्रियंका चोप्रा आणि सलमान खान २०१८मधील सर्वाधिक चर्चित कलाकार

combo
नव्या वर्षात स्कोर ट्रेंड्सकडून सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनाससाठी एक गोड बातमी आली आहे. सलमान आणि प्रियंकाच २०१८मधील सर्वाधिक चर्चित कलाकार होते हे नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून सिध्द झाले आहे. स्कोर ट्रेंड्सच्या १ जानेवारी २०१८ पासून ३१ डिसेंबर २०१८ या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर १ स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका २०१८मधील ‘बॉलीवूड ट्रेंड सेटर’ ठरले आहेत.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर गेल्या वर्षभरात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ कालावधीत) सुपरस्टार सलमान खान ५२ आठवड्यांपैकी २४ आठवडे तर २० आठवडे प्रियंका नंबर वन स्थानी विराजमान असल्याने, दोघेही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचे दिसून येते आहे. ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे उपलब्ध झाली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, २०१८ या संपूर्ण वर्षभरात प्रियंका आणि सलमान दोघेही सातत्याने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिले. सलमानचे विवाद असोत की, कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे चित्रपट असोत. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. निक जोनाससोबतच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियंका चोप्राचीही सातत्याने बातम्यांमध्ये होती. त्याच कारणास्तव तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. म्हणूनच प्रियंका आणि सलमान दोघांचाही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांवर वरचष्मा दिसून येत आहे.

Leave a Comment