प्रिया प्रकाशचा पहिलाच बॉलीवूड चित्रपट अडकला वादात

priya-prakash
एक व्हिडिओ क्लिप 2018 च्या सुरूवातीलाच व्हायरल झाली एका रात्रीतच ज्या व्हिडिओमुळे अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर सेलिब्रिटी बनली होती. प्रियाने या व्हिडिओत आपल्या नजरेने नेटीझन्सना घायाळ केले आणि आपली दखल घ्यायला लावली होती. आता हीच प्रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

नुकताच प्रिया प्रकाशच्या ‘श्रीदेवी बंगलो’या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. मल्यालम चित्रपटा ओरु अदार लव्ह या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या प्रियाचा ‘श्रीदेवी बंगलो’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. पण या टिझरनंतर प्रिया सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे.

Leave a Comment