‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’मधील आणखी एक गाणे रिलीज

anil-kapoor
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट येत असून नुकतेच या चित्रपटातील ‘इश्क मिठा’ हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे.

प्रेक्षकांना ‘इश्क मिठा’ गाण्यात अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा पंजाबी डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे ‘गुड नाल इश्क मिठा’ या गाण्याचे रिमेक आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. यात सोनमच्या आयुष्यातील एक गूपित आहे, ज्याबद्दल ती वारंवार ट्रेलरमध्ये बोलत असते असे दाखविण्यात आले आहे.

चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विधू विनोद चोप्राची बहिण शैली चोप्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Leave a Comment