खार जिमखान्याने रद्द केले हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व

hardik-pandya
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्याला ‘कॉफी विथ करण’मधील महिलांवरील आक्षेपार्ह टिप्पणी अतिशय महागात पडली आहे. मुंबईतील खार जिमखानाने बीसीसीआयच्या कारवाईनंतर आता हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व काढून घेतले आहे. खार जिमखान्याने त्याला ऑक्टोबर 2018 मध्ये मानद सदस्यत्व बहाल केले होते.

आम्ही मानद सदस्यत्व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना देतो, आम्ही तसेच त्याला देखील दिले, असे खार जिमखान्याचे सहसचिव गौरव कपाडिया यांनी सांगितले. आमचे फेसबुक अकाऊंटवर 4000 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. हार्दिकच्या टिप्पणीनंतर मोठा वाद सुरु झाल्यानंतर बरेचसे सदस्य, विशेषत: महिलांनी मागणी केली की क्लबने यावर काहीतरी पावले उचलायला हवीत. त्यामुळे सोमवारी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कपाडिया म्हणाले.

Leave a Comment