रणवीरला ‘सिम्बा’मुळे मिळाली ‘हॉट’ चीअरलीडर

ranveer-sing
अभिनेता रणवीर सिंह आणि नवोदित अभिनेत्री सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिम्बा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. रणवीर सिंहचा या चित्रपटामधील अभिनय कौतुकास्पद आहे. त्यासोबतच अभिनेता सोनू सूद याने देखील त्याच्या अभिनयाची जादू दाखविली आहे. त्यांच्या सोबतच बॉलीवूडमध्ये नव्याने पदार्पण करणा-या अभिनेत्री सारा अली खान हिनेदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

रणवीर सिंहने या चित्रपटात संग्राम भालेराव या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात यशवंत रानडे ही खलनायकाची भूमिका सोनू सूदने वठविली आहे. सगळ्यांना या चित्रपटाच्या यशामुळे फायदा झाला असेल यात वाद नाहीच. पण ‘सिम्बा’ रणवीर सिंह याचा या चित्रपटाच्या ‘हिट’ होण्याने थोडा जास्त फायदा झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभियानामुळे त्याला एक ‘हॉट’ चिअरलीडर मिळाली आहे. या चिअरलीडरचा व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

My Cheerleader 😍❤️😘🥂 @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


ही चीअरलीडर त्याची पत्नी दीपिका पादुकोण असून दीपिकाचा एक अगदी छोटा व्हिडीओ रणवीरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. दीपिका यात सिम्बा चित्रपटातील एक डायलॉग म्हणताना आणि त्यानंतर थोडासा अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडिओला तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळताना दिसत आहेत.

Leave a Comment