तुमच्या भेटीला पुन्हा येत आहे ‘गजनी’?

aamir-khan
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने सर्वांचीच निराशा केली. प्रेक्षकांना आमिरच्या या बिग बजेट चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट दणक्यात आपटला. या चित्रपटाच्या अपयशाचीही जबाबदारी आमिरने स्विकारल्यानंतर तो आता आपल्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. आमिर २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकसाठी तयारी करत आहे.

आमिर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर बॉक्स ऑफीसवर दमदार वापसी करू इच्छित आहे. यासंदर्भात ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘गजनी’च्या सिक्वलच्या दृष्टीने आमिरने फिटनेसची जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘गजनी २’ हे शीर्षकसुद्धा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नोंदविले आहे. या शीर्षकाची नोंदणी हिंदी आणि तेलुगू भाषेसाठी करण्यात आली आहे.

आमिरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आगामी चित्रपटासाठी फिटनेसच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे म्हटले होते. पण कोणता हा चित्रपट आहे हे मात्र त्याने स्पष्ट केले नव्हते. बॉक्स ऑफीसवर ‘गजनी’ने ११४ कोटींचा गल्ला जमवला होता. १०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट होता.

Loading RSS Feed

Leave a Comment