केरळमधील ७० वर्षीय चहाविक्रेते दाम्पत्याने पालथे घातले तब्बल २० देश

tea-seller
एखाद्या चहाविक्रेत्याची कमाई असून असणार किती असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडेल. पण आपला चहाचा व्यवसाय सांभाळत केरळमधील एका चहा विक्रेते दाम्पत्याने एक दोन नाही तर तब्बल 20 देशांचा प्रवास केला आहे. या दाम्पत्याने आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत आपले जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

सर्वांसाठीच केरळमधील विजयन आणि मोहना यांची ही गोष्ट प्रेरणादायी आहे. त्यांचे जगभरातील अनेक जण फॅन झाले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देखील त्यांच्या या फॅन लिस्टमध्ये आहेत. महिंद्रा एका पोस्टद्वारे या दोघांचा एक व्हिडियो शेअर करत त्यांचे कौतुक करतात.


आपल्या पोस्टमध्ये महिंद्रा म्हणतात, फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत भले हे दोघे नसतील. पण ते माझ्यादृष्टीने देशातील श्रीमंतांच्या यादीत नक्की आहेत. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हीच त्यांची खरी संपत्ती आहे. जेव्हा त्यांच्या गावी मी जाईन तेव्हा त्यांची मी नक्कीच भेट घईन असेही महिंद्रा आवर्जून सांगतात. आपले आयुष्य अशापद्धतीने अतिशय वेगळ्या आणि उत्तमपद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महिंद्रा कायम प्रोत्साहन देत असल्याचे आपल्याला दिसते. या दाम्पत्याचा महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून त्यावर असंख्य जणांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. जवळपास अडिच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये या दाम्पत्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

Leave a Comment