जिओपेक्षाही स्वस्त प्लान व्होडाफोन-आयडियाने आणला

vodafone
नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडियाने रिलायन्स जिओ आणि सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला टक्कर देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणला आहे. कॉलिंग, डेटा सहित सर्वसुविधा या ऑफरमुळे एका वर्षासाठी मोफत मिळणार आहेत.

व्होडाफोन-आयडियानुसार, आपल्या ग्राहकांसाठी त्यांनी एक वर्ष कालावधी असलेला प्लान लाँच केला आहे. हा प्लान 1499 रूपयांचा आहे. व्होडाफोन-आयडिया या प्लानमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा कोणत्याही इतर शुल्कविना मिळणार आहे. तसेच यामध्ये ग्राहक दररोज 1 जीबी 3जी/4जी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकणार आहेत.

ग्राहकांना व्होडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा कोणत्याही इतर शुल्कविना लाभ घेता येणाह आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लानमध्ये व्होडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या 1699 च्या प्लानला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन-आयडियाने 1499 रूपयांचा प्लान लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या 1699 रुपयांच्या प्लानमध्ये मोफत कॉलिंग, रोज दीड जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच यामध्ये जिओ टीव्ही, जिओ मूव्हीज आणि जिओ सावन समवेत इतर अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

Leave a Comment