गूगलने प्ले स्टोअरवरुन हटलेली 85 घातक अॅप्स

google
मुंबई : आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स आपण वापरतो. डेव्हलपर वेगवेगळ्या कारणांसाठी विविध अॅप्स बनवून गुगल प्ले स्टोअरवर अपलोड करत असतो. पण यातील अनेक अॅप्स फेक किंवा तुमच्या फोनसाठी घातक असतात. तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा या अॅप्सच्या माध्यमातून चोरी होऊ शकतो. अशी 85 अॅप्स गूगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवली आहेत.

या अपबद्दल ट्रेण्ड मायक्रो नावाच्या ब्लॉगमध्ये अॅप्सच्या सिक्युरिटी रिसर्चर्सनी माहिती दिली. तुमच्या फोनमध्ये ही अॅप्स बॅकग्राऊंडला सुरु असतात आणि तुमच्या मोबाईलची कार्यक्षमता कमी करतात. या ब्लॉग पोस्टनुसार ही घातक अॅप्स 90 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड केली होती. यातील ‘Easy Universal TV Remote’ या एकाच अॅपचे 50 लाखांहून अधिक डाऊनलोड्स आहेत.

ही घातक अॅप्स डाऊनलोड करुन लॉन्च केल्यावर फूल स्क्रीन पॉप अप येते. तुम्ही यात चुकून पॉपअपवर क्लिक केले तर एक नवीन पेज ओपन होते, बंद केल्यावरही जे पुन:पुन्हा ओपन होत राहते आणि अॅप क्रॅश होते. इन्स्टॉल केल्यानंतर काही अॅप्स काही वेळासाठी गायब होतात आणि यूजरला काही वेळाने परत दिसू लागतात. काही अॅप्स तुम्ही स्क्रीन अनलॉक करताना अक्टिव्ह होऊन फूल स्क्रीन अॅड्स दाखवते.

गुगलने हटवलेल्या अॅप्सची यादी
*SPORT TV
*Extreme Trucks
*Canais de TV do Brasil
*Prado Car 10
*TV SPANISH
*Canada TV Channels 1
*Prado Parking
*3D Racing
*TV
*USA TV 50,000
*GA Player
*Real Drone Simulator
*SPORT TV
*Prado Parking Simulator 3D
*TV WORLD
*City Extremepolis 100
*American Muscle Car
*Idle Drift
*Offroad Extreme
*Remote Control
*Moto Racing
*TV Remote
*A/C Remote
*Bus Driver
*Trump Stickers
*Love Stickers
*TV EN ESPAÑOL
*Christmas Stickers
*Parking Game
*TV EN ESPAÑOL
*TV IN SPANISH
*Brasil TV
*Nigeria TV
*WORLD TV
*Drift Car Racing Driving
*BRASIL TV
*Golden
*TV IN ENGLISH
*Racing in Car 3D Game
*Mustang Monster Truck Stunts
*TDT España
*Brasil TV
*Challenge Car Stunts Game
* Prado Car
*UK TV
*POLSKA TV
*Universal TV Remote
* Bus Simulator Pro
*Photo Editor Collage 1
* Kisses
* Pirate Story
*Spanish TV
*Prado Parking City
*PORTUGAL TV
*SPORT TV 1
*SOUTH AFRICA TV
*3d Monster Truck
* ITALIA TV
*Vietnam TV
*Movies Stickers
*Police Chase
*South Africa TV
*Garage Door Remote
*Racing Car 3D
*TV
*TV Colombia
*Racing Car 3D Game
*World Tv
*FRANCE TV
*Hearts
*TV of the World
*WORLD TV
*ESPAÑA TV
*TV IN ENGLISH
*TV World Channel
*Televisão do Brasil
*CHILE TV

Leave a Comment