फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप केले 120 कोटी रुपये खर्च

whatsapp
मुंबई : फेक पोस्टबद्दल जनजागृती करण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेंजरने तब्बल 120 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअॅप मागील काही दिवसांपासून फेक न्यूजबाबत टीव्ही, रेडिओ आणि वृतपत्राच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. देशात अनेक घटना व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे घडल्यानंतर व्हॉट्सअॅपला सरकारने नोटीस पाठवल्यानंतर व्हॉट्सअॅपकडून हे पाऊल उचलले गेले.

प्रिंट मीडियाच्या जाहिरातीवर व्हॉट्सअॅपने सर्वाधिक खर्च केले असल्याचे कळते. दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिरातीचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपकडून या जाहिरातीला विविध 10 भाषांमध्ये प्रसारीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आम्ही फेक पोस्टवर निर्बंध घालण्यासाठी जास्तीत जास्त पैसा जाहिरातीवर खर्च करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही आतापर्यंत 10 कोटी लोकांपर्यंत फेक न्यूज पसरवू नये हा संदेश पोहोचवला असल्याची माहिती व्हॉट्सअॅपच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment