आता व्हिक्टोरिया बेकहॅम लवकरच सुरु करणार स्वतःचा युट्युब चॅनल

victoria
प्रथितयश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम लवकरच स्वतःचा युट्युब चॅनल सुरु करणार असल्याचे वृत्त आहे. व्हिक्टोरिया अतिशय प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून, स्वतःचा चॅनल सुरु करणार असल्याची घोषणा या चव्वेचाळीस वर्षीय ‘स्पाईस गर्ल’ ने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये केली असल्याचे समजते.
victoria1
या चॅनलच्या माध्यमातून व्हिक्टोरिया सध्या चलनात असलेल्या फॅशनविषयी टिप्स देणार असून, यामध्ये अनेक ब्युटी टिप्सचा ही समावेश असणार आहे. त्याच बरोबर एखादा पेहराव कश्या प्रकारे परिधान केला जावा आणि त्याच्या जोडीने त्याला साजेलसे प्रसाधन कसे केले जावे हे शिकविणारे व्हिडियो देखील या चॅनलवर पहावयास मिळणार आहेत.
victoria2
व्हिक्टोरिया ही स्वतः प्रथितयश फॅशन डिझायनर असून, एक ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ती आणि डेव्हिड ब्रिटनमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. इतकेच नव्हे तर यांची अपत्ये देखील ते घालीत असलेल्या अतिशय स्टायलिश पोषाखांच्या मुळे प्रसारमाध्यमांचे आकर्षण ठरीत असतात.

Leave a Comment