
अभिनेता रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ‘राजी’ या दोन दमदार चित्रपटानंतर ही जोडी आता पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गली बॉय’ असे असून नुकताच त्याचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
रणवीर-आलियाच्या गली बॉयचा ट्रेलर रिलीज
‘गली बॉय’च्या कथानकासाठी मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून प्रेरणा घेण्यात आली आहे. रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाची जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते.
या चित्रपटात रणवीर आणि आलियासोबतच एक मराठमोळी अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. यामध्ये रणवीरच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता सुभाष आहे. १४ फेब्रुवारीला झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
