असा करा ‘लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स’साठी ऑनलाईन अर्ज

driving-licence
मुंबई : आता आधारला तुमचा वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्सही जोडावे लागणार असल्याचे कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते पण अद्याप तुम्ही गाडी चालवायची शिकण्याच्या स्टेजमध्ये असाल तर लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवले नसेल तर यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही यामुळे वाचू शकेल. ही पद्धत अगदी सोपी आहे आणि त्यामुळे तुमच्या आरटीओ ऑफिसच्या फेऱ्याही टळतील. तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी केवळ २०० रुपये फी भरावी लागेल. लर्निंग लायसन्ससाठी कमीत कमी १८ वर्षांची वयोमर्यादा आहे.

तुम्हाला यासाठी मंत्रालयाची वेबसाईट https://parivahan.gov.in/sarathiservice10/stateSelection.do वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. येथे शिकावू (Learner) हे ऑप्शन तुम्हाला निवडावे लागेल. येथे क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडतो. हा फॉर्म भरल्यानंतर एक क्रमांक जनरेट होईल. हा क्रमांक तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. येथे तुम्हाला वय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा तसेच ओळखपत्र जोडावे लागेल.

तुम्हाला या प्रक्रियेनंतर आपला फोटो आणि डिजिटल सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर टेस्टसाठी एक वेळ बुक करावी लागेल. वेळेची निवड करताना तुम्हाला २०० रुपये फी भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ज मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येईल.

फी भरल्यानंतर निर्धारित वेळेनुसार आरटीओ ऑफीसमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. यात यशस्वी ठरल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ऑनलाईन लर्निंग लायसन्स तुम्हाला ऑनलाईनच प्राप्त होईल. हे लर्निंग लायसन्स पुढच्या सहा महिन्यांपर्यंत वैध असेल. तुम्हाला या सहा महिन्यांदरम्यान पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर एका महिन्यानंतर आणि सहा महिन्यांच्या आत तुम्हाला दुसऱ्यांदा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. दुसऱ्यांदा टेस्टमध्ये यशस्वी ठरल्यानंतर पर्मनंट लायसन्स तुम्हाला मिळू शकेल.

Leave a Comment