तुम्ही पाहिला आहे का ऋषभ पंतचा भन्नाट डान्स ?

rishabh-pant
पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण कसोटी मालिका भारताने मात्र २-१ने जिंकली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला ही कसोटी मालिका चांगलीच फलदायी ठरली. ऋषभ पंतने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. त्याने भारताचा रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीलादेखील मागे टाकले. त्याच्या खेळामुळे आणि स्लेजिंगमध्ये तो चर्चेत आलाच. पण त्यासह तो त्याच्या ‘कुल’ अंदाजांमुळेही लोकप्रिय ठरला.


हनुमा विहारी चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बाद झाल्यानंतर पंत सातव्या क्रमांकावर मैदानामध्ये उतरला. पंतने आक्रमक खेळी करत अवघ्या १८९ चेंडूमध्ये १५९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीमध्ये चौकार आणि षटकारांचा रतीबच लावला होता. पंतची ही खेळी पाहून मैदानामधील ‘भारत आर्मी’ने त्याच्यावर एक गाणे तयार केले. तो मालिका संपल्यानंतर मैदानावर त्याच गाण्यावर नाचताना दिसला. भारत आर्मीने त्याचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

Leave a Comment