सीबीआय वादावर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा

raj-thakre
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात मोदी सरकारला दणका देत आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केल्यामुळे पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून आलोक वर्मा रुजू होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकाला आपआपली जागा दाखवली अशा आशयाचे मोदी सरकारला बोचणारे व्यंगचित्र काढले आहे.


आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ‘या वर्माजी बसा’ असे म्हणत असून त्यांना सीबीआय संचालकाच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करताना या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तर वर्मा यांच्या फेरनियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोध करत असल्याचे दाखवण्यात आले असून मोदी न्यायाधीशांच्या निर्णयानंतर केवळ न्यायाधीशांकडे आ वासून पाहात असल्याचे दिसत आहे.