व्हॉटस्अॅपवर एकाच वेळी पाठवता येणार 30 ऑडिओ क्लिप

whatsapp
नवी दिल्ली – आताच्या तरुणाईमध्ये व्हॉटस्अॅपची प्रचंड क्रेझ आहे. व्हॉटस्अॅप युजर्सचे चॅटींग आणखी मजेशीर करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉटस्अॅपवर 2019 या नववर्षात PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. आता याच यादीत आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. लवकरच व्हॉटस्अॅपवर एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणे शक्य होणार आहे. युजर्सला या नव्या अपडेट फीचरमुळे ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.


व्हॉटस्अॅपवर होणाऱ्या या नव्या बदलाबाबत ‘WABetaInfo’ ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. हे नवीन फीचर व्हॉटस्अॅपच्या Android App (व्हर्जन 2.19.1) बीटा व्हर्जनवर मिळणार आहे. आपल्या कॉन्टॅक्टना ऑडिओ क्लिप पाठवण्याची पद्धत बदलण्यावर व्हॉटस्अॅप काम करत आहे. ऑडिओ क्लिपचा ऑडिओ प्रिव्ह्यू आणि इमेज प्रिव्ह्यू यामध्ये दिसणार आहे. तसेच एकाचवेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणे शक्य होणार आहे. हे फीचर व्हॉटस्अॅपवर लवकरच येणार आहे.

Leave a Comment