‘गली बॉय’साठी रणवीरने गायलेले रॅप साँग ऐकले का?

gully-boy
आज झोया अख्तर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलिजची तारीख जाहीर करण्यात आली असून या चित्रपटाचा ट्रेलर ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘गली बॉय’मध्ये झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग ट्रेलर रिलिजची तारीख जाहीर करताना प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक रॅप साँग गाताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओवरून एकंदरितच चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेची झलकही दाखवण्यात आली आहे.

धारावीमध्ये ‘गली बॉय’चे बरचेस चित्रिकरण करण्यात आले आहे. हे स्पष्टपणे आज प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्येही दिसून येते. रणवीर सिंग, आलिया भट, कल्की कोचलिन, अमृता सुभाष असे सर्वच कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ट्विटसहीत सर्वच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा दिसून येत आहे. सकाळपासूनच ट्विटवर #GullyBoy आणि #AsliHipHop हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. हा व्हिडीओ रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, आलिया भट, करण जोहर, अशा अनेक कलाकारांनी शेअर केल्याने हे हॅशटॅग ट्रेण्डिंग होताना दिसत आहेत. येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment