कुंभमेळ्यातील फ्रान्सचे ‘डॅनियल बाबा’ आहेत चर्चेत

daniel-baba
अवघ्या काही दिवसांवर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणारा कुंभ मेळा येऊन ठेपला आहे. 15 जानेवारी ते 4 मार्च दरम्यान हा कुंभमेळा सुरु राहणार आहे. या कुंभमेळ्यात संगमनगरी येथे भगवा कपडे घातलेला एक फ्रान्सी बाबा चर्चेचा विषय बनले आहेत. तेथील लोक त्यांना ‘डेनियल बाबा’च्या नावाने ओळखतात.

‘डेनियल बाबां’नी आपला धर्म परिवर्तन करुन देवगिरी संताला आपला गुरू मानले आहे. त्याने हिंदू धर्म स्विकारुन आपले नावही बदलून भगवान गिरी ठेवले आहे. एक साधू जे काही करतात ते सर्व ‘डेनियल बाबा’ करतात. ते इतर साधू सोबत जेवण ही करतात तसेच एका संताच्या आयुष्याप्रमाणे जीवन जगतात. भारतात राहून ‘डेनियल बाबां’नी तोडकी-मोडकी हिंदी भाषा देखील शिकली आहे. हे बाबा योगा करतात आणि चक्क भजन देखील करतात. कुंभच्या आनंद अखाडेच्या धर्म ध्वजाच्या स्थापनेत ‘डेनियल बाबां’नी सहभाग घेतला होता. कुंभमेळा संपेपर्यंत ते प्रयागराजमध्येच राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

फ्रांन्समधील आपला आरामदायी जीवन आणि आपला व्यवसाय सोडून आलेले भगवान गिरी म्हणजे ‘डेनियल बाबा’ हे आपल्या आधीच्या जीवनाबाबत काहीच सांगत नाही. मात्र असे सांगण्यात येत आहे की, त्याची करोडोंची संपत्ती आहे. तरीही त्यांना भारतामधून जायचे नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, मला सनातन धर्म सर्वात चांगला आणि शांती प्रिय वाटतो. त्यामुळे ते आपले पुढील जीवन यामध्येच व्यतीत करणार आहेत.

Leave a Comment