शिखर धवनचा ‘हा’ व्हिडीओ प्रत्येक पतीने नक्कीच पाहायला हवा

shikhar-dhawan
नाते अधिक मजबूत उत्तम बाँडींगमुळे होते. एकमेकांच्या सुख-दु:खात यासाठी सहभागी व्हावे लागते. आपल्या जोडीदाराला प्रत्येक कामात मदत करणे, जबाबदारी वाटून घेतल्याने नाते मजबूत होते. शिखर धवनचा हा व्हिडीओ घरातील कामांना दुय्यम मानणाऱ्या पुरुषांनी एकदा नक्कीच पाहावा.


सोशल मीडियावर टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच स्फोटक फलंदाज शिखर धवन नेहमीच सक्रिय असतो. त्याला आपण पत्नी आयेशा आणि मुलांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना पाहतो. शिखरने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिखर धवन या व्हिडीओमध्ये घरातील साफ-सफाई करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन घरातील कामे करण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नाही, कारण घर दोघांचे आहे. घरातील साफसफाई करण्यासोबतच जेवणही बनवतो. हवे तेवढे चवदार असणारे जेवण बनवता येत नाही पण प्रयत्न करत असतो. घरांमध्ये तुम्हीही पत्नीला मदत करा. कारण जेवढी पत्नीची घर सांभाळण्याची जबाबदारी आहे तेवढीच तुमची देखील आहे. आपल्या बायकोला एकदा तरी कामात मदत करुन पहा तुम्हाला आनंद वाटेल, असे म्हणत आहे.

व्हिडीओ पोस्ट करताना त्यासोबत शिखर धवनने आपले मतही व्यक्त केले आहे. शिखर धवनचे आपल्या पत्नीप्रति असलेले प्रेम आणि आदर त्या ओळीतून दिसून येतो. आतपर्यंतच्या माझ्या सर्वोत्कृष्ट भागिदारापैकी एक माझी पत्नी आयेशा आहे. कारण, मुलांच्या संगोपनापासून ते घर साफ करण्यापर्यंत अशा प्रत्येक गोष्टीमध्ये दोघांचाही सहभाग असतो. चाहत्यांनी शिखर धवनच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Comment