१२ ते १४ जानेवारी असे सलग तीन दिवस बँका बंद

bank
मुंबई : सार्वजनिक सुट्ट्यांमुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १२ ते १४ जानेवारी असे सलग तीन दिवस बँक व्यवहार बंद राहणार असल्यामुळे बँक कर्मचारी संघटनेने दुस-या आठवड्याच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे व्यवहार आटोपण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ग्राहकांना तिस-या आठवड्यात अधिक त्रास सहन करावा लागणार नाही.

दुसरा शनिवार १२ जानेवारीला, १३ जानेवारीला रविवार आणि १४ जानेवारीला मकरसंक्रांत आणि पोंगल सणांमुळे बँक कर्मचा-यांना सुट्टी असेल. परिणामी, रोख व्यवहारांसह धनादेश वठणावळही बंद असेल. शनिवारी व रविवारी ग्राहक रोख रकमेसाठी बँक एटीएमवर उड्या घेतील. त्यामुळे ऐन सणासुदीत रोख रकमेची चणचण जाणवू शकते. परिणामी, आॅनलाइन व्यवहारापासून दूर असलेल्या ग्राहकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन बँक कर्मचारी संघटनेने केले आहे.

Leave a Comment