
हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री सेलेना गोमेजने आपल्या शरीराची एवढी काळजी घेत आहे, की तिने गेल्यावर्षी आपल्या फिटनेसवर खुप पैसे खर्च केले आहेत. आपल्या फिटनेसवर सेलेना जवळपास 300 डॉलर प्रति तास खर्च करते. यासंदर्भात ‘ईआॉनलाइन डॉट कॉम’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या स्वास्थ्यात गेल्यावर्षी सेलेनाला खूप चढ-उतार पाहायला मिळाले.
ही अभिनेत्री फिटनेससाठी 1 तासाचे मोजते 21 हजार
तिला ल्यूपस आणि किडनी प्रत्यारोपणाकरिता चिंता आणि डिप्रेशनमुळे रूग्णालयात देखील दाखल व्हावे लागले. 26 वर्षीय ही गायिका गेल्या महिन्यात आपल्या घरी आली आहे. आता ती घरी आली असून तिला बरे वाटत आहे. सेलेना आता परिवारासोबत वेळ घालवत असून तिला मित्र-मैत्रिणींची खूप साथ आहे. ती लवकरच तिचे रूटीन फॉलो करेल.
तिने लॉस एंजिल्समध्ये 300 डॉलर एका तासासाठी खर्च केले आहेत. खाजगी ग्राहकांसाठी प्रशिक्षकांवर जवळपास 125 डॉलर प्रति तास उपलब्ध असतात. त्यांच्यावर देखील खर्च केले आहेत. आपल्या खासगी आयुष्यामुळे सेलेना कायमच चर्चेत असते. पहिला बॉयफ्रेंड जस्टिन बीबरसोबत ब्रेकअप केल्यानंतर सेलेनाने डीजे जेडला डेट करायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर 2008 मध्ये सेलेना गोमेजचे निक जोनससोबत देखील अफेअर सुरू होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. काहीच महिन्यानंतर अगदी 2009 मध्येच हे दोघे वेगळे झाले.
