रजनीकांत यांच्या ‘पेटा’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज!

rajanikanth
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘पेटा’ चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. रजनीकांतशिवाय या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, विजय सेथुपत्ती, सिमरण आणि त्रिशा हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

आपला नेहमीप्रमाणेच अनोखा अंदाज ट्रेलरमधूनही रजनीकांत यांनी दाखवून चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरुन दिसत आहे. याआधी तेलुगू भाषेत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात नवाजुद्दीन सिंगार सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तो तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुबाराज यांनी केले असून पुढील वर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment