‘सिम्बा’ने अवघ्या ५ दिवसात पार केला १२४ कोटींचा आकडा

simmba
प्रेक्षकांनी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. अवघ्या ५ दिवसात चित्रपटाने १२४ कोटींचा टप्पा पार केला आहे.


‘सिम्बा’ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) २०.७२ कोटी, शनिवारी २३.३३ कोटी, रविवारी ३१.०६ कोटी, सोमवारी २१.२४, मंगळवारी २८.१९ कोटी अशी एकून १२४.५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या २ दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला असल्याचे यातून दिसून येते आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ मुंबईमधूनच १२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि रणवीरने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटात रणवीर संग्राम भालेराव नावाच्या पोलिसाच्या भूमिकेत आहे.

Leave a Comment