युट्युबवरुन गायब झाला ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर

anupam-kher
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर चित्रपटाविरोधात एकच वाद पेटलेला दिसत आहे. यू ट्यूबनेही आता चित्रपटाचा ट्रेलर हटविला असून तो पुन्हा अपलोड करावा, यासाठी अनुपम खेर यांनी ट्विटवरुन मदत मागितली आहे.

आपल्या ट्विटरवर अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. पण चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, यू यूट्यबवर ट्रेलर दिसत नसल्यामुळे अनुपम यांनी चित्रपटाबाबत जाहिर चिंता व्यक्त केली आहे.


डिअर यूट्यूब फोन आणि मॅसेजेस मला येत आहेत की, देशाच्या अनेक ठिकाणी यूट्यूबवर The Accidental Prime Minister trailer टाइप करून सर्च केल्यावर काही दिसत नाही. जर दिसले तर अगदी खाली 50 व्या स्थानावर आहे. आम्ही 1 नंबरवर ट्रेंड करत होतो कृपया मदत करावी. आता यूट्यूबवर ट्रेलर 18 व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे, असे ट्विट अनुपम यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाला प्रचंड विरोध केला आहे. यामध्ये गांधी कुटुंबियांची चुकीची बाजू दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment