
कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींनी २०१८ स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या निमिताने एकमेकींची गळाभेट घेऊन अखेरीस त्यांच्यातील ‘शीतयुद्ध’ संपविले असल्याचे समजते. कतरिनाने दीपिकाच्या विवाहोत्तर स्वागत समारंभासाठी हजेरी लावल्यानंतर दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्यातील मतभेद दूर करून एकमेकींशी मैत्री केली असून, आता इन्स्टाग्रामवरही या अभिनेत्री एकमेकींना ‘फॉलो’ करीत असल्याचे समजते.
अखेर दीपिका आणि कतरिनामध्ये मैत्री झालीच
स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या समारंभाच्या वेळी या अभिनेत्रींनी एकमेकींशी गळाभेट घेतल्याचे वृत्त त्वरितच व्हायरल झाले असले, तरी या प्रसंगाची साक्ष देणारा व्हिडियो मात्र नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडियो पाहिल्यानंतर या अभिनेत्रींनी त्यांच्यातील ‘शीत युद्ध’ संपवून मैत्री केली असल्याचा आनंद या दोधी अभिनेत्रींच्या चाहत्यांना झाला आहे. या मैत्रीचे श्रेय रणवीर सिंहला असून, दीपिका आणि कतरिना यांनी आपापसात मैत्री करण्यामध्ये रणवीरचाच पुढाकार असल्याचे समजते.
‘जे झाले ते झाले, ते सर्व मी विसरले असून, कतरिना बद्दल मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे’, असे दीपिका फिल्मफेअर मासिकाशी बोलताना म्हणाली. या दोन्ही अभिनेत्रींची आपापसात मैत्री झाल्यानंतर या दोघींना एकत्र पडद्यावर बघण्याची इच्छा आता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
