केट मिडलटन आणि मेघन मार्कल ठरल्या सर्वात कमी व्यस्त शाही सदस्य

ROYAL
‘ब्रिटीश कोर्ट सर्क्युलर’ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, केट मिडलटन आणि मेघन मार्कल या दोन शाही सदस्यांची, २०१८ साली आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती सर्वात कमी असल्याचे दिसून आले आहे. शाही परिवारातील सर्वच सदस्य वर्षभरामध्ये अनेक औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. वर्षभर सातत्याने सुरु असलेल्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये शाही परिवाराचे सर्वच सदस्य अतिशय व्यस्त असतात. पण या सर्व सदस्यांमध्ये केट आणि मेघन या सर्वात कमी व्यस्त असलेल्या शाही परिवाराहच्या सदस्य ठरल्या आहेत. ब्रिटीश कोर्ट सर्क्युलर दर वर्षी सर्वेक्षण करीत असते, आणि या सर्वेक्षणाच्या मार्फत कोणत्या शाही सदस्याने वर्षातील किती दिवस औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली ही माहिती प्रसिद्ध होत असते.
ROYAL1
शाही परिवारातील सर्वच सदस्यांच्या मानाने, २०१८ सालामध्ये मेघन आणि केट यांनी सर्वात कमी कार्यक्रमांना हजरी लावली आहे. यामागे देखील काही करणे आहेत. मेघन मार्कलचा समावेश शाही परिवारामध्ये मुळातच अर्धे वर्ष उलटून गेल्यानंतर, म्हणजेच मे २०१८ साली तिचा विवाह प्रिन्स हॅरीशी पार पडल्यानंतर झाला. त्यानंतर वर्षभरामध्ये मेघनने गर्भवती असूनही ९६ औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.
ROYAL2
केट मिडलटनने वर्षभरामध्ये केवळ ८७ औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली असून, २०१८ च्या एप्रिल महिन्यामध्ये तिची झालेली प्रसूती हे त्यामागील कारण आहे. पण याही पूर्वी केटचा उल्लेख अनेकदा सर्वात ‘आळशी’ शाही सदस्य असा केला गेला आहे. शाही परिवाराच्या नवीन पिढीने औपचारिक कार्यक्रमांसाठी अश्या प्रकारची उदासीनता दाखविणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. केट ही भविष्यामध्ये इंग्लंडची राणी म्हणून ओळखली जाणार असल्याने तिने जास्तीत जास्त औपचारिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे गरेजेचे असल्याचेही अनेकांचे मत आहे. केटच्या मानाने प्रिन्स विलियम याने गेल्या वर्षभरामध्ये २२० औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली असून, खुद्द राणी एलिझाबेथने वयाची ९२ वर्षे उलटून गेली असतानाही गेल्या वर्षाभरामध्ये तब्बल २८० औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली असल्याचे समजते.

Leave a Comment