बिपाशा म्हणते, आहारामध्ये साखर वर्ज्य करणे आवश्यक

bipasha-basu
बॉलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री केवळ तिच्या अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या फिटनेस साठी देखील ओळखली जाते. अभिनेत्री बिपाशा बासू संपूर्ण शारीरिक फिटनेसच्या शिवाय ‘नो शुगर डायट’ ची ही पुरस्कर्ती आहे. साखरेऐवजी आहारामध्ये मध समाविष्ट केला जावा असे बिपाशा म्हणते. केवळ खाद्यपदार्थांमधील साखर नाही, तर पेयांमध्येही मध समाविष्ट केला जाण्याबद्दल बिपाशा आग्रही असते. साखर शरीरातील डोपामाईनची पातळी वाढविते. त्यामुळेच साखरेच्या सेवनाने शरीरामध्ये त्वरित उर्जा निर्माण होते. यालाच ‘ब्लड शुगर स्पाईक’ म्हटले जाते. पण जितक्या वेगाने ही पातळी वाढते, तितक्याच झपाट्याने ही खालीही येते. साखरयुक्त पदार्थांचे आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन आहारामधून कमी केले जाण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यतज्ञही म्हणतात. या सर्व पदार्थांच्या सेवनामुळे लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, दातांच्या समस्या प्रामुख्याने पहावयास मिळत असतात.
bipasha-basu1
बिपाशाच्या म्हणण्यानुसार आहारातून साखरेचे प्रमाण कमी करणे अवघड असले, तरी अशक्य खचितच नाही. अनेक पदार्थांमध्ये साखर आहे, हे आपल्याला माहित नसते (hidden sugars) आणि अश्या पदार्थांचे सेवन आपण करीत असतो. अश्या पदार्थांमध्ये ब्रेड, पास्ता, त्यांवरील निरनिराळे सॉसेस, यांचा देखील समावेश आहे. अश्या प्रकारच्या पदार्थांद्वारे साखरेचे सेवन टाळले जाण्यासाठी तयार अन्नापदार्थांवरील लेबल्स काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये कृत्रिम स्वीटनर्स, फ्रुक्टोज, सुक्रोज, मोलासेस, इत्यादी पदार्थांचा समावेश असल्यास यामध्ये साखर आहे असे समजण्यास हरकत नाही.
bipasha-basu2
साखरयुक्त पदार्थांच्या ऐवजी ज्यांमध्ये साखर अजिबात नाही (unsweetened) अश्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला बिपाशा देते. तसेच सामन्य दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आहारातील प्रमाण कमी करून आल्मंड मिल्क( बदमांपासून तयार करण्यात येणारे दुध), सॉय मिल्क( सोयाबीनपासून तयार करण्यात येणारे दुध) , भरपूर ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश आहारामध्ये केला जाणे आवश्यक असल्याचे बिपाशा म्हणते. या सर्व पदार्थांच्या सोबतीनेच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचाही योग्य मात्रेमध्ये समावेश आहारामध्ये असणे आवश्यक असल्याचे बिपाशा म्हणते. यांमुळे सतत साखर किंवा काही ना काही गोड खाण्याची इच्छा नियंत्रित राहत असल्याचे बिपाशा म्हणते.