व्हायरलः हा ढोंगी बाबा महिलांच्या पार्श्वभागाला हात लावून देतो आशिर्वाद

baba
सोशल मीडियावर एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच व्हायरल होत असून महिलांना भक्तांसमोरच अश्लिलपणे स्पर्श करणाऱ्या या ढोंगी बाबाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एक महिला या ढोंगी बाबाच्या पाया पडत आशिर्वाद मागत असल्याचे व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे हा बाबा आशिर्वाद दिल्यानंतर निर्धास्तपणे महिलेला कमरेच्या खाली स्पर्श करताना दिसत आहे. यावर ना ती महिला आक्षेप घेते, ना तिथे उपस्थित कोणी भक्त घेतो.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा बाबा जेव्हा महिलेसोबत अश्लिल कृत्य करत होता तेव्हा हा व्हिडीओ तिथेच उपस्थित एका व्यक्तीने मोबाइलवर शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ढोंगी बाबाच्या वागण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून अश्लिल कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. ढोंगी बाबाच्या या कृत्याचा सोशल मीडियावर लोक निषेध व्यक्त करत आहेत. दरम्यान हा बाबा कोण आहे ? तसेच व्हिडीओ कुठला आहे ? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Leave a Comment