पर्थ – ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना 140 धावांवर भारताचा संपूर्ण संघ माघारी परतला. भारताचे उर्वरित पाच फलंदाज पाचव्या दिवशी अवघ्या 15 षटकांत माघारी परतले. 146 धावांनी हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. दोन्ही डावांत मिळून 8 विकेट घेत फिरकीपटू नॅथन लियॉनने या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कर्णधार विराट कोहलीच्या नावावर या पराभवानंतर मात्र नकोसा विक्रम नोंदवला गेला. पुढेही हाच विक्रम वाढत राहिल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही तो मागे टाकू शकतो.
विराट कोहलीच्या नावे जमा झाला नकोसा विक्रम
Congratulations to Australia on a big comeback. The key was their opening partnership in the 1st innings & scoring 326. @mstarc56 & #Hazlewood didn’t allow good partnerships upfront in both the innings. @NathLyon421 continues his magic by picking crucial wickets. #INDvAUS pic.twitter.com/QH59HSbtXA
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 18, 2018
2018 या वर्षात धावांचा पाठलाग करताना भारताला सहा पराभव पत्करावे लागले आहेत. भारताला दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा धावांचा पाठलाग करता आला नव्हता, तर तीन सामन्यांत इंग्लंडमध्येही ते अपयशी ठरले आणि आता पर्थवरही त्याची पुनरावृत्ती झाली.