जेव्हा बापाला झिवा देते डान्सचे धडे…

mahendra-singh-dhoni
महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचे व्हिडिओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. धोनी सोशल मीडियावर झिवाचे गोड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतो न करतो तोच ते व्हायरलही होतात. धोनीचे जगभरात असणारे अगणित चाहते आता झिवाचेही चाहते झाले आहेत. धोनीने आता झिवा आणि धोनीचा आणखी व्हिडीओ पोस्ट केला आहे.


झिवा आपल्या वडिलांना इंस्टाग्रामवरील या व्हिडिओत नाचायचे कसे याचे धडे देत आहे. झिवा एका गाण्यावर डान्स करत आहे. त्यानंतर झिवाच्या स्टेप्स पाहून त्याप्रमाणे धोनी डान्स करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Leave a Comment