नारायण राणेंच्या घरी पोहचले शरद पवार

combo
सिंधुदुर्ग – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कणकवली येथील त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांची यादरम्यान १० मिनिटे चर्चा झाली असून, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तर लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या तिकीटासाठी निलेश राणे उत्सुक आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे पवार-राणेंच्या या भेटीला राजकीय तर्क-वितर्काचे उधाण आले आहे.

Leave a Comment