ऑस्ट्रेलियाच्या मीडिया कंपनीविरुद्ध मानहानीचा दावा ख्रिस गेलने जिंकला

chris-gyale
ऑस्ट्रेलियाच्या एका मीडिया कंपनीविरुद्ध विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने मानहानीचा दावा ठोकला होता. त्याकंपनीने या प्रकरणी गेलला ३ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (२ लाख २० हजार डॉलर्स)ची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश न्यू साऊथ वेल्सच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश लुसी मॅक्कलम यांनी दिले आहेत.

२०१५च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान गेलने अशोभनीय कृत्य केल्याचे वृत्त फेअरफॅक्स मीडिया या कंपनीने चालवले होते. गेलची प्रतिमा त्यामुळे डागाळली असे सांगत त्याने हा दावा ठोकला होता. सोमवारी यावर न्यायालयाने निकाल जाहीर केला. दरम्यान फेअरफॅक्स मीडिया कंपनी या निर्णयाविरोधात दाद मागणार आहे. असे सांगितले जात आहे.

ख्रिस गेलने सिडनीतील सामन्यात मसाज थेरपिस्टसमोर अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप फेअरफॅक्स मीडियाच्या The Sydney Morning Herald, The Age and The Canberra Times या वृत्तपत्रांनी केला होता. त्यानंतर गेलने त्यांच्यावर या प्रकरणी मानहानीचा दावा ठोकला होता. ऑक्टोबर २०१७ चार सदस्यीय ज्युरींनी या प्रकरणी गेलच्या बाजूने निर्णय दिला होता. आता न्यू साऊथ वेल्स सर्वोच्च न्यायालयानेही गेलच्या बाजूनेच निर्णय दिला आहे. मीडिया कंपनी आपल्या वृत्ताला दुजोरा देणारा एकही सबळ पुरावा न्यायालयासमोर सादर करू न शकल्यामुळे असा निर्णय देण्यात आला आहे.

Leave a Comment