एअरलाइन्स कंपन्या आता बंद करणार मोफत वेब चेक इन!

मुंबई : विमानाने जर तुम्ही प्रवास करत असाल आणि वेब चेकइन करत असाल तर ही सेवा आता मोफत मिळणार नाही. या करता फी आकारण्याचा निर्णय स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअरलाइन्सने घेतला आहे. भारतात स्वस्त असलेल्या एअरलाइन्स कंपन्यांची हालत खराब होत आहे. याकरिता नवनवे पर्याय शोधून काढत आहे. प्रवाशांनी याबाबत विरोध दर्शवायला सुरूवात केली आहे.

चेक इन ही सेवा एअरपोर्टवर मोफत असणार असून इंडिगोकडून १०० रुपये आणि स्पाइस जेटकडून ९९ रुपये फी आकारली जाणार आहे. आपल्या आवडीची सीट निवडण्यासाठी या अगोदर प्रवाशांना अधिक रक्कम भरावी लागत होती. विंडो फेसिंग आणि अतिरिक्त लेग स्पेसच्या सीटकरता अनेकांना अधिक पैसे द्यावे लागत होते. पण ही सेवा अजूनही गोएअर फ्री सेवा पुरवत आहे. पण ही सेवा गोएअर अजून किती दिवस मोफत देणार आहे याबाबत कोणतीच माहिती नाही. तर सीट निवडण्यासाठी जेट एअरवेज आणि विस्तारा कोणतेही चार्ज आकारले जाणार नाहीत.


कंपनी अशाप्रकारच्या सेवांना फी आकारून आपले उत्पन्न वाढवत आहे. बॅगेज फी, सीट सिलेक्शन फी आणि कॅन्सलेशन फीचा देखील यामध्ये समावेश आहे. याबाबत इंडिगोने अधिकृत माहिती दिली असून त्यांनी सीटच्या एडव्हान्स सिलेक्शनच्या किंमतीत देखील बदल केला आहे. हे काम पूर्ण विश्व आणि भारतात एअरलाइन्स करणार आहे.

विमान मंत्रालयाकडून या मुद्यावर ट्विट करण्यात आले आहे. मंत्रालयानुसार या प्रकरणाची ते चौकशी करणार असून ही गोष्ट अनबंडल्ड प्रायसिंगच्या नियमांतर्गत येणार की नाही याची तपासणी करणार आहे. विमानन रेग्युलेटरने एअरलाइन्सला या प्रकारच्या सेवेकरता फी आकारण्याची मंजूरी दिली आहे.

Leave a Comment