बीडमधील एका तरुणाला टपोरीगिरी करणे पडले चांगलेच महागात

jail
बीड : बीडमधील एका तरुणाला टपोरीगिरी करणे चांगलेच महागात पडले आहे. बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने मुलीकडे एकटक पाहून डोळा मारणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दोषीचे नाव पुरुषोत्तम ज्ञानदेव वीर असे असून तो शिरुर तालुक्यातील ढाकणवाडीचा रहिवासी आहे.

एप्रिल २०१७ हे प्रकरण मधील आहे. शिरुरला जाण्यासाठी रायमोहा चौकात तक्रारदार अल्पवयीन मुलगी उभी होती. पुरुषोत्तम वीर यावेळी बराच वेळ तिला रोखून पाहत होता आणि त्यानंतर तिला डोळा मारला. २० एप्रिल २०१७ रोजी पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये मुलीने तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल करुन एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

त्यानंतर सत्र न्यायालयाने दीड वर्षानंतर दोषीला शिक्षा सुनावली. दोषी पुरुषोत्तमला न्यायमूर्ती प्राची कुलकर्णी यांनी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिना त्याला तुरुंगातच काढावा लागणार आहे.

एखाद्या तरुणींकडे १४ सेंकद रोखून पाहणे अपराध असून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वक्तव्य केरळचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषीराज सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते. आता अशा प्रकरणात बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा होण्याची कदाचित ही पहिली घटना असावी.

Leave a Comment