इंटरनेटच्या बाबतीत ६९ टक्के पाकिस्तानी ‘अडाणी’

pakistan
सध्याच्या घडीला इंटरनेट म्हणजे जवळ-जवळ प्रत्येकाच्या आयुष्यातील एक फार महत्वाचा घटक बनला आहे. इंटरनेट हे कामासाठी असो किंवा मनोरंजनासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी लागतेच. पण ६९ टक्के पाकिस्तानी लोकांना इंटरनेट म्हणजे काय आहे हेच माहित नाही. ही माहिती आयसीटी (सूचना-संचार तंत्रज्ञान)ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. या सर्वेचा रिपोर्ट पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र डॉनने प्रसिद्ध केला आहे. इंटरनेट म्हणजे काय हे १५ ते ६५ वयोगटातील ६९ टक्के पाकिस्तानी नागरिकांना माहित नसल्याचे यामधून समोर आले आहे.

१५२ मिलियन सक्रिय सेल्युलर सब्सक्रायबर असल्याची माहिती पाकिस्तानची टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये २२ टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतात तर फिचर फोनचा वापर २५ टक्के लोक करतात. तर बाकीच्या ५३ टक्के लोकांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. रिपोर्ट्सनुसार, इंटरनेटचा वापर लोकांमध्ये असलेल्या जागरूकतेमुळे कमी आहे. या सर्व्हेत फक्त पाकिस्तानच नव्हे, तर दुसऱ्या आशियाई देशांमधील इंटरनेट सेवेसंदर्भात जागरूकता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांच्या तुलनेत पाकिस्तानमधील महिला इंटरनेटचा ४३ टक्के कमी वापर करतात. तर भारतात हे प्रमाण ५७ टक्के असून, बांगलादेशमध्ये ६२ टक्के आहे. यासंदर्भात पाकिस्तानमधील दोन हजार कुटुंबियांचा सर्वे करण्यात आला होता. यामध्ये १५ ते ६५ वर्ष वयांच्या व्यक्तींचा समावेश होता. ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंतच्या कालावधीत करण्यात आला होता.

Leave a Comment