पंकजा मुंडेंचा सावरगाव येथील दसरा मेळाव्यात विरोधकांवर कवितेतून निशाणा

pankaja-munde
बीड – दसरा मेळाव्यातील भाषणातून नाव न घेतला धनंजय मुंडेंना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टोला लगावला. तसेच माझ्या पाठीशी भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती आहे. जनतेची ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी कशालाच घाबरत नसल्याचे म्हणत पंकजा यांनी विरोधक आणि भाजपमधील अंतर्गत विरोधकांवरही नाव न घेता टीका केली. तसेच ‘तू दबे पाव चोरी छुपे से न आना, सामने से वार करना, फिर मुझे आजमाना’ असा काव्यात्मक टोलाही पंकजा यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

मुंडेसाहेब हे वाघ होते आणि त्यांची मी कन्या वाघीण आहे. तुम्ही माझ्या रक्ताची हाडामासाची माणसे आहात. मी त्यामुळे कशालाच घाबरत नसल्याचे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. काही सर्वे मध्यतरी आले, प्रितमताईंची खासदारकी धोक्यात, धोक्याची घंटा असे काहीही ज्यामध्ये सांगण्यात आले. पक्षात आम्ही चांगल काम करा म्हटले की, हे असले सर्व्हे आले. पण, तसले सर्व्हे-फिर्व्हे मी मानत नाही. माझी तुम्ही, माणसे हीच माझा सर्व्हे आहे, येथे येऊन पाहा, असे म्हणत पंकजा यांनी पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना टोला लगावला. यावेळी पंकजा यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मौत से ठन गई या कवितेतील ओळींच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष केले. आम्ही कामी करतो, मनोरंजनाचे कार्यक्रम करत नाही. त्यांनी एखादा हौद तरी बांधला का ? असे विरोधकांना टोला लगावताना म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

आपण यंदा प्रथमच बीड जिल्ह्यात दसरा मेळावा घेत आहोत. पण, आज खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यात भगवान बाबांचे आगमन झाले आहे. आज भगवान बाबांच्या पुतळ्याचे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे लोकार्पण होत आहे. हे पवित्र स्थान आजपासून भगवान भक्तीगड म्हणून ओळखला जाईल असेही पंकजा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले.

Leave a Comment