रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदी एसबीआयच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य

arundhati-roy
मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली असून अतिरिक्त संचालक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.

पाच वर्षांसाठी भट्टाचार्य यांची नियुक्ती असणार असून त्यांचा कार्यकाळ भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८पासून सुरु झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिल्याचे म्हटले आहे.

सुमारे ४० वर्षांच्या कामाचा अनुभव अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात आहे. एसबीआयच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने गेल्याच आठवड्यात भट्टाचार्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

Leave a Comment