नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असे काही करेल हे मान्य नाही – राज ठाकरे

raj-thakre1
अमरावती – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असे काही करेल हे मान्य नसल्याचे म्हणत नानांची पाठराखण केली. तसेच महिलांनी पुरुषी अत्याचाराचा उल्लेख नक्की करावा पण हा आरोप तेव्हाच करायचा दहा वर्षांनी नाही असेही राज ठाकरे म्हणाले. त्यांनी विविध विषयांवर आपली मते अमरावती येथील अंबा फेस्टिव्हल ट्रस्टच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत मांडली.

असे काही चित्रपट सृष्टीमध्ये घडत असेल तर तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले यांना त्रास झाला नसेल का?, १५ वर्षांची असताना मी चित्रपट सृष्टीत आले तेव्हा एका कवीने त्यांना त्रास दिला डायरेक्टरने त्याला तेव्हाच काढले असे लता मंगेशकर यांनी माझ्या मुलाखतीत सांगितल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं. आज जे वातावरण ‘मी-टू’च्या माध्यमातून पेटवले जात आहे, त्यातून या प्रकरणातील गांभीर्य निघून जाण्याचा धोका आहे. या अतिशय संवेदनशील विषयाची चेष्टा व्हायला नको, असे आपले मत आहे.

Leave a Comment