व्हिडीओ; महिलेला स्कायडायव्हिंगचा अनुभव पडला ‘बत्तीशी’ला


थराराचे प्रत्येकालाच नेहमी आकर्षण असते आणि प्रत्येकाच्या थरार अनुभवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ती काळजी थराराच्या वेळी घेतली नाही, तर त्याचे काय परिणाम होतात. याची परिणीती एका महिलेला आली आहे. ही महिला स्कायडायव्हिंग करत होती. या दरम्यान, ती हवेचा तीव्र झोत असतानाही सतत तोंड उघडे ठेवत होती, हासत होती आणि परिणामी जे व्हायचे तेच झाले.

यट्यूबवर उपलब्ध असलेल्या या व्हिडिओत या महिलेची तोंडातील बत्तीशी (सर्व दात) हवेत उडाली. स्कायडायव्हिंगचा थरार ही महिला अनुभवत होती. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहाल तर तुमच्या ध्यानात येईल. थरार अनुभवताना योग्य ती काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे.

Leave a Comment