चक्क ७ कोटींचा एक बटाटा


मुंबई : आपल्या सर्वसाधारणपणे एक किलो बटाटा घेण्यासाठी आपण २० रुपये मोजतो. पण युरोपातील एका व्यापाऱ्याने एक बटाटा तब्बल ७ कोटींना खरेदी केला आहे. लागला ना झटका… पण हे सत्यात अवतरले आहे. जो बटाटा या व्यक्तीने खरेदी केला आहे ती एक पेंटींग असून त्याने ही पेंटींग ७ कोटींना विकत घेतली आहे. पण तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की या व्यापाऱ्याने एका बटाट्याची पेंटींग ७ कोटींना का बरी विकत घेतली असेल? तर आम्ही सांगतो तुम्हाला त्यामागचे कारण…

प्रसिद्ध आयरिश फोटोग्राफर लेन्समॅन केविन अबॉशने हा फोटो २०१० मध्ये काढला होता. केविन अबॉशने यानंतर या फोटोची पेंटींग तयार केली. १.५ लाख डॉलरला केविनची ही पेंटिंग विकली गेली. ब्लॅक ड्रॉप पोट्रेट फोटोग्राफीसाठी केविनला ओळखले जाते. केविनला बटाटा खूप आवडतो. त्याने बटाट्याची ही पेंटींग काढण्यासाठी अनेक फोटो काढले होते. या फोटोची पेटींग ज्यामध्ये तयार करण्यात आली. त्याची पेंटींग एक प्रसिद्ध फोटोग्राफरच्या फोटो पेक्षा अधिक महाग आहे. जेव्हा यूरोपच्या एका व्यापाऱ्याने ही पेंटींग पाहिली तेव्हा तो या पेंटींगच्या प्रेमात पडले आणि ७ कोटी देऊन त्यांनी ही पेंटींग खरेदी केली.

Leave a Comment