स्वतःच्याच वरातीत जुम्मा-चुम्मा गाण्यावर थिरकला नवरदेव


सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील लग्नाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. नव्या नवरीच्या डान्सपासून वरातीत होणाऱ्या डान्सपर्यंत असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण आता आता असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका वरातीमध्ये चक्क नवरदेवच आपल्या मित्रांबरोबर ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. घोडागाडीत बसलेल्या नवरदेवाने जागीच डान्स सुरु केला आणि त्याचवेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन यांच्या ‘हम’ चित्रपटातील “जुम्मा चुम्मा दे दे” हे गाणे वाजण्यास सुरुवात झाली आणि अचानक नवरदेव नाचू लागला. त्याचवेळी दुसरीकडे उभे असलेले मित्र देखील त्याच्याबरोबर ठेका धरू लागले. त्यानंतर ‘साजनजी घर आये’ या गाण्यावर देखील नवरदेव नाचला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Leave a Comment