बीएसएनएल १४९ रुपयांत देणार ४ जीबी डेटा दररोज


रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतीय दूरसंचार निगम कंपनी अर्थात बीएसएनएलने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. ग्राहकांना यामध्ये १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. फिफा विश्वचषक स्पेशल डेटा एसटीव्ही १४९ असे बीएसएनएलच्या नवीन ऑफरचे नाव आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन फिफा वर्ल्डकपच्या दरम्यान मर्यादित असेल. १४ जून ते १५ जुलैपर्यंत ग्राहकांना या प्लॅनचा फायदा घेता येणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लानच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ आपल्या ग्राहकांना पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी १०० मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या १४९ प्लॅनला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने हा प्लॅन बाजारात आणला आहे. आता रोज अतिरिक्त १.५० जीबी डेटा देण्याची घोषणा रिलायन्स जिओने केल्यामुळे आता १४९ रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना दररोज ३ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. यासोबतच कॉल आणि एसएमएस सुद्धा करता येणार आहेत. तर ७९९ रुपयांच्या रिचार्जवर सर्वाधिक ६.५० जीबी डेटा रोज मिळणार आहे. बीएसएनएलचा १४९ रुपयांचा हा प्लान आजपासून लागू करण्यात आला आहे. बीएसएनएलची सेवा देशभरात आहे, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे.

Leave a Comment